Chicken Biryani Recipe: (Malvani Style)
५-६ जणांसाठी
साहित्य:
चिकन मारीनेशन:
२.५ -३ टीस्पून बिर्याणी मसाला + १ टीस्पुन मटण मसाला (किंवा चिकन मसाला) , चवीप्रमाणे कमी जास्त चालेल.
पेस्ट साठी :
३ मोठ्या पाकळ्या लसूण
१ इंच आले
२ मोठ्या हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी पुदिना
अर्धी वाटी कोथिंबीर
मीठ चवीप्रमाणे
१/२ चमचा हळद
१ किलो चिकनला वरील सर्व साहित्य लावून अर्धा ते एक तास झाकून ठेवावे.
टोमेटो प्युरी - १ ते १.५ टोमेटो कापून मिक्सरला लावून प्युरी करून घेणे. (चिकन शिजवताना टाकण्यासाठी)
भातासाठी:
२.५ ते ३ वाटी तांदूळ (४०-४५ मिनिटे तांदूळ भिजवून ठेवणे)
१० मिरी
३ तमालपत्र
१.५ दगडफूल
८ लवंगा
३-४ तुकडे दालचिनी
६ हिरवी वेलची
१ मसाला वेलची
मीठ
तेल
थरासाठी:
१ वाटी तळलेला कांदा
अर्धी वाटी कोथिंबीर
अर्धी वाटी पुदिना
पद्धत:
तळलेला कांदा -
१. पसरट भांड्यामध्ये जास्त तेल टाकून एक मोठा उभा चिरलेला कांदा पूर्ण भाजून घेणे. (Full Brown Color)
२. कांदा भाजून झाला कि बाजूला काढून ठेवणे.
चिकन -
१. कांदा भाजून उरलेल्या तेलात बारिक चिरलेला अर्धी वाटी कांदा परतून घेणे. (तेल कमी असेल तर नविन तेल टाकणे. (Should be total @ 3 Table Spoon)
२. कांदा लालसर झाला कि मसाला लावून ठेवलेलं चिकन टाकून चांगले परतून घेणे. झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवणे.
३. टोमेटो प्युरी (वर केलेली) टाकून परतणे व पुन्हा झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवणे. चवीनुसार मीठ चेक करणे.
भात -
१. एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी टाकून उकळवून घेणे. ३ वाटी तांदूळ असतील तर कमीत कमी १.५ लिटर पाणी.
२. पाणी उकळत आले कि जेवढे वाटी तांदूळ तेवढे टी स्पून मीठ टाकणे. (म्हणून पाणी भरपूर जास्त पाहिजे.)
३. लगेच वारीला भातासाठी साहित्यातील गरम अक्खे मसाले टाकणे.
४. २ टेबल स्पून तेल टाकणे. (भात सुटा होण्यासाठी)
५. वरील सर्व साहित्य टाकल्यावर पाणी चांगले उकळून घेणे.
६. भिजत ठेवलेले तांदूळ निथळून उकळत्या पाण्यात टाकणे.
७. भात ६०-७०% शिजला कि पाणी निथळून घेणे. (भात पूर्ण शिजवू नये)
बिर्याणी :
१. चिकन असलेल्या भांड्यात वरील ६० ते ७०% शिजलेल्या भाताचा एक थर लावणे.
२. त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकणे.
३. भाताचा दुसरा थर लावणे.
४. त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकणे.
५. झाकण ठेवून पहिली ७-८ मिनिटे मध्यम आचेवर आणि नंतर १२-१३ मिनिटे मंद आचेवर शिजवणे. (Total २० मिनटे)
६. Gas बंद करून १५ मिनिटे बिर्याणी झाकूनच ठेवणे. (थर लावल्यानंतर मध्ये झाकण अजिबात उघडू नये)