Showing posts with label खवय्येगिरी. Show all posts
Showing posts with label खवय्येगिरी. Show all posts

Wednesday, August 10, 2016



Chicken Biryani Recipe: (Malvani Style)





५-६ जणांसाठी

साहित्य:

चिकन मारीनेशन:
२.५ -३ टीस्पून बिर्याणी मसाला + १ टीस्पुन मटण मसाला (किंवा चिकन मसाला) , चवीप्रमाणे कमी जास्त चालेल.

पेस्ट साठी :
३ मोठ्या पाकळ्या लसूण
१ इंच आले
२ मोठ्या हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी पुदिना
 अर्धी वाटी कोथिंबीर
मीठ चवीप्रमाणे
१/२ चमचा हळद

१ किलो चिकनला वरील सर्व साहित्य लावून अर्धा ते एक तास झाकून ठेवावे.

टोमेटो प्युरी - १ ते १.५ टोमेटो कापून मिक्सरला लावून प्युरी करून घेणे. (चिकन शिजवताना टाकण्यासाठी)

भातासाठी:
२.५ ते ३ वाटी तांदूळ (४०-४५ मिनिटे तांदूळ भिजवून ठेवणे)
१० मिरी
३ तमालपत्र
१.५ दगडफूल
८ लवंगा
३-४ तुकडे दालचिनी
६ हिरवी वेलची
१ मसाला वेलची
मीठ
तेल

थरासाठी:
१ वाटी तळलेला कांदा
अर्धी वाटी कोथिंबीर
अर्धी वाटी पुदिना


पद्धत:

तळलेला कांदा  -
१. पसरट  भांड्यामध्ये जास्त तेल टाकून एक मोठा उभा चिरलेला कांदा पूर्ण भाजून घेणे. (Full Brown Color)
२.  कांदा भाजून झाला कि बाजूला काढून ठेवणे.

चिकन  -
१.  कांदा भाजून उरलेल्या तेलात बारिक चिरलेला अर्धी वाटी कांदा परतून घेणे. (तेल कमी असेल तर नविन तेल टाकणे. (Should be total @ 3 Table Spoon)
२. कांदा लालसर झाला कि मसाला लावून ठेवलेलं चिकन टाकून चांगले परतून घेणे. झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवणे.
३. टोमेटो प्युरी (वर केलेली) टाकून परतणे व पुन्हा झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवणे. चवीनुसार मीठ चेक करणे.

भात -
१. एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी टाकून उकळवून घेणे. ३ वाटी तांदूळ असतील तर कमीत कमी १.५ लिटर पाणी.  
२. पाणी उकळत आले कि जेवढे वाटी तांदूळ तेवढे टी स्पून मीठ टाकणे. (म्हणून पाणी भरपूर जास्त पाहिजे.)
३. लगेच वारीला भातासाठी साहित्यातील गरम अक्खे मसाले टाकणे.
४. २ टेबल स्पून तेल टाकणे. (भात सुटा होण्यासाठी)
५. वरील सर्व साहित्य टाकल्यावर पाणी चांगले उकळून घेणे.
६. भिजत ठेवलेले तांदूळ निथळून उकळत्या पाण्यात टाकणे.
७. भात ६०-७०% शिजला कि पाणी निथळून घेणे.  (भात पूर्ण शिजवू नये)

बिर्याणी :
१. चिकन असलेल्या भांड्यात वरील ६० ते ७०%  शिजलेल्या भाताचा एक थर लावणे.
२. त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकणे.
३. भाताचा दुसरा थर लावणे.
४. त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकणे.
५. झाकण ठेवून पहिली ७-८ मिनिटे मध्यम आचेवर आणि नंतर १२-१३ मिनिटे मंद आचेवर शिजवणे. (Total २० मिनटे)
६. Gas बंद करून १५ मिनिटे  बिर्याणी झाकूनच ठेवणे. (थर लावल्यानंतर मध्ये झाकण अजिबात उघडू नये)

Friday, February 25, 2011

कोलंबी भात

साधारण पद्धत मला माहित नाही. पण गेली बरीच वर्ष मी ज्या पद्धतीने करतोय तो पद्धत देतो.

साधारण ४-५ माणसांसाठी
 
साहित्य: 
तांदूळ - ३ वाट्या
ताजी कोलंबी - सोललेली १.५ ते २ वाटी,
कांदे - २ उभे चिरलेले
आले - पाऊण इंच
लसूण - ६-७ पाकळ्या
हिरवी मिरची - ३ मध्यम आकाराच्या
कोथिंबीर - पाव वाटी चिरलेली
लाल तिखट - १ टी स्पून
हळद - १/२ टी स्पून
गरम मसाला पावडर - १.५ टी स्पून
बटाटे - २
टोमॅटो - १-२ मध्यम
तेल - ३ टेबल स्पून
मीठ - चवीनुसार
 
पूर्वतयारी:
१) ३ वाट्या तांदूळ २० मिनिटे भिजत ठेवून नंतर निथळत ठेवावे.
२) आले, लसूण, मिरची एकदम बारीक चिरून घ्यावे. अथवा एकत्रित पेस्ट करून घ्यावी.
३) बटाटे लांबट आकारात साधारण एकाच साईजचे कापून घ्यावेत.
४) टोमॅटो मध्यम आकारात चिरून घ्यावे.
५) पाणी ६.५ वाट्या मोजून घेणे व कडक गरम करून घेणे.
 
कृती: (कुकरसाठी)
१) मोठ्या कुकरमध्ये ३ टेबल स्पून तेल मध्यम तापवून घेणे.
२) तेल तापल्यावर उभा चिरलेला कांदा टाकून लाल रंगावर परतवून घेणे.
३) बारीक चिरलेली आले, लसूण, मिरची किंवा त्याची पेस्ट टाकणे व १ मिनिट परतल्यावर कोलंबी आणि बटाटे टाकणे. चवीप्रमाणे मीठ टाकणे व ३-४ मिनिटे झाकण ठेवून द्यावे.
४) वर दिलेल्या प्रमाणानुसार हळद, लाल तिखट टाकून अर्धा मिनिट परतणे. 
५) निथळून झालेले तांदूळ टाकणे व खरपूस परतून घेणे.  १.५ टी स्पून  गरम मसाला पावडर  टाकून साधारण १ मिनिट परतावे.
६) गरम केलेले ६.५ वाट्या पाणी टाकणे. एकदा नीट ढवळून घेणे.
७) उकळी येऊ लागल्यावर चिरलेला टोमॅटो टाकणे व झाकण बंद करणे.
८) मध्यम आचेवर १.५ शिट्टी द्यावी व गॅस बंद करावा.
९) १०-१५ मिनिटाने झाकण उघडून त्यात चिरलेली कोथिंबीर टाकावी व १० मिनिटे पुन्हा झाकून ठेवावे.

कोलंबी भात आणि सोलकढी ! झक्कास!!! :)