Thursday, June 24, 2010

पावसाळ्यातली आंबोली

पावसाळा सुरु झाला. सगळीकडे हिरवंगार व्हायला सुरवात झाली आहे.  सह्याद्रीच्या एका कड्यावर वसलेलं 'आंबोली' हे एक छोटसं हिल स्टेशन आहे. महाराष्ट्रातलं दक्षिणेकडच्या बाजूचं शेवटचं थंड हवेच ठिकाण! महाराष्ट्रातून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांनी मुद्दाम वाकडी वाट करून जावच असं. विशेषत: पावसाळ्यात तिकडे जायचा योग आला तर एक फेरी मारून यावीच.  सावंतवाडीवरून मुंबई-गोवा महामार्ग सोडून आतमध्ये फक्त ३० किमी जाव लागत.

 
 
 
 








 
पावसाळा जसा सुरु होतो आणि साधारण एक महिना होतो तसे आंबोलीमधील धबधबे सुरु होऊ लागतात आणि त्याचबरोबर त्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी पण होऊ लागते. अर्थात खऱ्या निसर्गप्रेमीच मन गजबजाटात रमत नाही. तरीही खूप चांगल स्थळ असूनही माथेरान किंवा महाबळेश्वर एव्हढी गर्दी नसते. तसेही आंबोलीला पायी किंवा वाहनाने फिरता येण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेत.

जवळची अजून पाहण्यासारखी म्हणजे नांगरतास धबधबा आणि हिरण्यकेशी.

संधी मिळाली तर एकदातरी आंबोलीला भेट द्याच!

No comments:

Post a Comment